जळगाव : यावल येथे अतिक्रमणविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या माजी नगराध्यक्ष बाळू शिर्के यांनी नगराध्यक्ष अतुल पाटील आणि मुख्याधिकारी सोमनाथ आढाव यांच्यावर रॉकेल अंगावर टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यास सकाळी सुरुवात झाली. बोरावल गेट परिसरात पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत शिर्केला त्याच्या मुलासह ताब्यात घेतले आहे.