जळगावात रंगली खडसे- उज्ज्वल निकम जुगलबंदी

वकील लोकं कसं खऱ्याचं खोट आणि खोट्याच करून दाखवतात, असा टोला  महसूल मंत्री एकनाथ खडसे लगावला तर राजकारणी बिना डिग्रीचे कसे निष्णात वकील असू शकतात अशी खास शब्दांत टीपण्णी करत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम  यांनी केली. 

Updated: Sep 20, 2015, 10:00 PM IST
जळगावात रंगली खडसे- उज्ज्वल निकम जुगलबंदी  title=

जळगाव : वकील लोकं कसं खऱ्याचं खोट आणि खोट्याच करून दाखवतात, असा टोला  महसूल मंत्री एकनाथ खडसे लगावला तर राजकारणी बिना डिग्रीचे कसे निष्णात वकील असू शकतात अशी खास शब्दांत टीपण्णी करत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम  यांनी केली. 

खडसे आणि निकम यांच्यातील जुगलबंदी जळगावात एका कार्यक्रमात रंगलेली पाहायला मिळाली. निमित्त होत लेवा एज्युकेशन संस्थेत "क्रॉस एक्जामिनेषण ऑफ ए लॉयर" या पुस्तक प्रकाशन समारंभाचं. 

न्यायालयात खोट कसं बोलावं हे मला वकिलानेच शिकवलं असं वक्तव्य खडसे यांनी उज्ज्वल निकम यांच्याकडे बोट दाखवून केलं. त्यामुळे गुन्हेगार असल्यावरही आपण निर्दोष सुटलो असा गौप्यस्फोट खडसे यांनी यावेळी केला. 

तर खडसे कायद्याचे पंडित नसले तरी वकीलाप्रमाणे खडसे यांच्याकडे प्रतिपक्षाला कसं निरुत्तर करायचं याचं उत्तम कौशल्य असल्याचे उज्ज्वल निकम म्हणाले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.