विकास भदाने, जळगाव : चार भिंतींच्या आड वसलेल्या कारागृहांत कशी बजबजपुरी माजलेली असते, याचे अनेक किस्से आतापर्यंत उजेडात आले आहेत. त्याचीच साक्ष देणारी घटना, जळगाव जिल्हा कारागृहात समोर आली आहे. या कारागृहात कैद्यांची भेट घडवण्यासाठी, कैद्यांच्या नातेवाईकांकडून लाच घेतली जाते
कैद्याची नुसती विंडो विजीट घ्यायची असेल, तर नातेवाईकाला शंभर रुपये मोजावे लागतात. आणि प्रत्यक्ष भेटीकरताचा लाचेचा दर पाचशे रुपये ठरवण्यात आलाय. विशेष म्हणजे कारागृहातल्या कैद्यांमार्फतच ही लाच कारागृह कर्मचाऱ्यापासून थेट जेल अधीक्षकांपर्यंत विभागून पोचवली जात असल्याचा आरोप आहे.
स्वतः लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं टाकलेल्या छाप्यातच हा धक्कादायक प्रकार उघडक झालाय. एका तक्रारदारानं केलेल्या कारवाईनंतर एसीबीनं जिल्हा कारागृहात सापळा रचून, समाधान चौधरी या कैद्याला पाचशे रुपयांची लाच घेताना अटक केली.
कैदी चौधरी यांने ही लाचेची रक्कम शशिकांत पवार या कारागृह रक्षकाकडे सुपूर्द केली होती. त्यामुळे एसीबीने शशिकांत पवारलाही अटक केली. या प्रकरणी कारागृह अधीक्षकांचीही चौकशी होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.