पुण्यात इंजिनीअर तरुणीची आत्महत्या

कोंढवा येथे एका आयटी इंजिनीअर तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बेंगळुरूला ती कामाला होती. काही कामानिमित्त ती  येथे आली होती.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 17, 2017, 02:12 PM IST
पुण्यात इंजिनीअर तरुणीची आत्महत्या title=

पुणे : कोंढवा येथे एका आयटी इंजिनीअर तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बेंगळुरूला ती कामाला होती. काही कामानिमित्त ती  येथे आली होती.

तिने प्रेमभंगातून तिने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. या तरुणीचं नाव जुही नितीन गांधी (२३, रा. शांतीनगर सोसायटी, कोंढवा बु.) असे आहे. 

तिने कोंढवा येथील सुमा सिल्व्हर सोसायटीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली. सतत फोन करूनही प्रियकर आपल्याशी बोलत नसल्याने जुही निराश होती. या निराशेतून तिने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. मात्र, तिच्या आत्महत्येमागील खरं कारण समजू शकलेले नाही. अधिक तपास पोलीस करत आहेत.