रत्नागिरी : जिल्ह्यातील दापोली, खेड आणि मंडणगड तालुक्यात कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांनी केल्यानंतर या सगळ्या घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
दापोली, मंडणगड आणि खेड या तीन तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांनी केला. झी 24 तासने बातमी लावल्यानंतर आता या सगळ्या घोटाळ्याची चौकशीचे आदेश राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले आहे. तसेच १५ दिवसात अहवाल सादर करा असे आदेश देखील सदाभाऊ खोतांनी दिले आहेत.
पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी या घोटाळ्याला दापोली विधानसभा मतदार संघाचे आमदार जबाबदार असल्याचं बोलले होते. मात्र या घोटाळ्याबाबत आपण सहा महिन्यापूर्वीच यातील कामांबाबत चौकशीची मागणी केली होती तसेच या सगळ्या प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे, असे म्हणत त्यांनी या घोटाळ्याला दुजोराच दिल्याचं बोललं जात आहे.
संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या घोटाळ्याबाबतचा विषय थेट जिल्हा नियोजनच्या बैठकीत ही गाजला. विरोधकांनी हा विषय लावून धरल्या संपूर्ण जिल्ह्याचीच चौकशी करवी तसेच दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे त्यासाठी चौकशी अहवालानंतर कारवाईबाबत निर्णय घेणार असल्यांचं ही त्यांनी सांगितले.
जलयुक्त शिवारमध्ये कोट्यवधी रुपये खर्च झालेत पण ज्या उद्देशाने ते खर्च झाले तो उद्देश कुठेच साध्य होताना दिसत नाही. त्यामुळे चौकशीनंतर मुख्यमंत्री आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यावर काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे.