गोंदिया : गोंदिया शासकीय स्त्री रुग्णालयाचा कारभाराचा पंचनामा करणारं आणखी एक उदाहरण समोर आलंय.
बाई गंगाबाई या रुग्णालयात उपचारांसाठी आलेल्या गोंदिया तालुक्यातील खमारी या गावात राहणाऱ्या गंगा मेश्राम या महिलेला प्रसूतीसाठी गोंदियाच्या खमारी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं.
मात्र, प्राथमिक आरोग्य केंद्रात ही महिला दाखल होताच तिथल्या डॉ. कुंदा गजभीये यांनी सांगितलं की बाळानं पोटातचं घाण केली असल्याने तिला बाई गंगा बाई स्त्री रुग्णालयात दाखल करावं लागलं.
मात्र, महिलेला रूग्णालयात वेळीच उपचार न मिळाल्याने बाळाची प्रकृती पोटातच खालावली... आणि प्रसूतीच्या दुसऱ्या दिवशीच बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप डॉ. गजभीये यांनी केलाय.