कल्याण-डोंबिवलीत भाजपमध्ये नाराजी, विद्यमान नगरसेविका अपक्ष रिंगणात

कल्याण डोंबिवलीत तिकिट वाटपानंतर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. विद्यामान नगसेविकेने बंडोखरी करत अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलाय. त्यामुळे या ठिकाणी भाजपला दणका बसण्याची शक्यता आहे.

Updated: Oct 17, 2015, 10:29 AM IST
कल्याण-डोंबिवलीत भाजपमध्ये नाराजी, विद्यमान नगरसेविका अपक्ष रिंगणात title=

डोंबिवली : कल्याण डोंबिवलीत तिकिट वाटपानंतर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. विद्यामान नगसेविकेने बंडोखरी करत अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलाय. त्यामुळे या ठिकाणी भाजपला दणका बसण्याची शक्यता आहे.

विद्यमान नगरसेविका अर्चना कोठावदे यांना भाजपकडून उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्या अत्यंत संतप्त झाल्यात. गेल्या २० वर्षांपासून भाजपची निष्ठावान आणि अत्यंत कार्यक्षम नगरसेवक असूनही केवळ स्थानिक आमदारामुळं तिकीट कापण्यात आल्याचा आरोप कोठावदे यांनी केलाय.

निष्ठावंताना डावलून नुकतंच मनसेतून आयात केलेल्या उमेदवार खुशबू चौधरी यांना भाजपनं उमेदवारी दिलीय. सावरकर रोड इथून मागच्या वेळी अर्चना कोठावदे निवडून आल्या होत्या.

यंदाही आपल्यालाच उमेदवारी मिळेल अशी खात्री कोठावदे यांना होती. त्यासाठी निवडणुकीची जोरदार तयारी त्यांनी सुरु केली होती. मात्र भाजपनं विश्वासघात केल्यानं धक्का बसल्याचं सांगत कोठावदे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलाय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.