होळीनिमित्ताने कोकणसाठी जादा एसटी गाड्या

होळी सणानिमित्त प्रामुख्याने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी नियमित एसटी बसेस व्यतिरिक्त 100 जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 9, 2017, 09:52 PM IST
होळीनिमित्ताने कोकणसाठी जादा एसटी गाड्या   title=

मुंबई : होळी सणानिमित्त प्रामुख्याने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी नियमित एसटी बसेस व्यतिरिक्त 100 जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.

मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला-नेहरूनगर या बसस्थकातून या गाड्या सुटणार आहेत. मुंबई सेंट्रल येथून दापोली, गुहागर, देवरूख, खेड, कासे पेडांबे, शेवते, बुरूंबेवाडी, मेढे व पिंपळोली या ठिकाणासाठी बसेस सुटतील.

परळ येथून खेड- दापोली, आंजर्ले ,मासरंग, भातगाव याठिकाणासाठी बसेस रवाना होतील. तर कुर्ला-नेहरूनगर येथून प्रामुख्याने गुहागर, चिपळून व दापोलीसाठी बस सुटतील. 

याव्यतिरिक्त पश्चिम महाराष्ट्र, खान्देश मराठवाडा या भागात जाणाऱ्या प्रवाशांसीठी या बसस्थानकातून उद्या व परवा (शुक्रवार शनिवार) रोजी दररोज 50 जादा एसटी सोडण्यात येणार आहेत.