नाशिक : शहरात झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील रस्त्यावर तलाव साठले होते.. संध्याकाळी दोन तास झालेल्या पावसाने दुचाकी धारक आणि वाहनधारकांच्या रांगा लागल्या होत्या.
या पावसाने मखमलाबाद, गंगापुर, गिरनार गावातील शेती पार उध्वस्त केलीय. विजांचा कड़कड़ाट आणि सोसाट्याचा वारा सुटल्याने अनेक घरांची पडझडही झाली.
नाशिक जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानं शेतकरी पुरता कोलमडला आहे. पिकांवर रोगराई वाढण्याची शक्यता निर्माण झालीय.
ऑक्टोबर छाटणीसाठी उभ्या असलेल्या द्राक्षबागांच सर्वाधिक नुकसान झालंय. कांदा, डाळिंब आणि भाताचे नुकसान झाल्याने कोट्यावधी रुपयांचे नुकसान शेतक-यांचं झालंय. गेल्या हंगामासाठी असाच फटका बसल्याने शेतकरी कर्जाच्या विळख्यात सापडलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.