राज्यात दमदार पाऊस, विदर्भात तीन दिवसांपासून संततधार

राज्यात सध्या सगळीकडेचं समाधानकारक पाऊस दिसून येतोय. एकाच दिवसातल्या विक्रमी पावसाने नाशिक जिल्ह्यातील धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. 

Updated: Jul 11, 2016, 09:15 AM IST
राज्यात दमदार पाऊस, विदर्भात तीन दिवसांपासून संततधार title=

मुंबई : राज्यात सध्या सगळीकडेचं समाधानकारक पाऊस दिसून येतोय. एकाच दिवसातल्या विक्रमी पावसाने नाशिक जिल्ह्यातील धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. 

गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात बाराशे मिमी पाऊसाची नोंद झाली आहे. तर धरण क्षेत्रात सर्वाधिक म्हणजे दीडशे ते दोनशे मीमी पावसाची नोंद झाली आहे. गोदामाई दुथडी भरुन वाहू लागली आहे. तर विदर्भात गडचिरोली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसाने जिह्यातील शंभरहून अधिक गावांचा संपर्क तुटलाय. 

भामरागड तालुक्याचा जिल्ह्याशी संपर्क तुटला होता. तर गडअहेरी नदीला पूर आलाय. लोकबिरादरी प्रकल्पाला चारी बाजूनं पाण्यानं वेढल्यानं बेटाचं स्वरूप आलंय. चंद्रपूरमध्येही धुवाँधार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी घरांच मोठं नुकसान झालंय. 

पालकमंत्र्यांनी पंचनामे करुन नुकसान भरपाईचे आदेश दिले आहेत, तर यवतमाळ शहराला पाणी पुरवठा करणारे निळोणा धरण भरले आहे.भंडारा जिल्यात 24 तासात 140 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. 

कोल्हापूर जिल्ह्यात दोन दिवसांत 24 तासांमध्ये जवळपास 130 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे, पंचगंगा नदीची पाणीपातळी तब्बल 10 फुटानं वाढली आहे, सांगली जिल्ह्यातल्या  कोयना आणि वारणा धरणक्षेत्रात जोरदार पाउस झाला आहे.