आजीनंच तीन महिन्यांच्या चिमुरडीला केलं ठार

एका आजीनंच आपल्या तीन महिन्याच्या गोंडस नातीचा खून केल्याची घटना पुण्यात उघडकीस आलीय. 

Updated: May 4, 2016, 07:28 PM IST
आजीनंच तीन महिन्यांच्या चिमुरडीला केलं ठार title=

पुणे : एका आजीनंच आपल्या तीन महिन्याच्या गोंडस नातीचा खून केल्याची घटना पुण्यात उघडकीस आलीय. 

तीन महिन्यांच्या मुलगी मृत आढळल्यानंतर या चिमुरडीच्या आईनं पोलीस स्टेशन गाठलं होतं. आपल्या पोटच्या गोळ्याचा हा मृत्यू नैसर्गिक नसल्याची तिलाही खात्री होती. 

तीन महिन्यांच्या या चिमुरडीचं बारसंही झालं नव्हतं. पोलिसांच्या तपासात तिचा तिच्या आजीनंच खून केल्याचं उघड झालं. यानंतर कोंढवा पोलिसांनी आजीला अटक केलीय.

या घटनेमुळे परिसर मात्र हादरून गेलाय.