नाशिक : नाशिकमध्ये भरलेल्या कुंभमेळ्याला आजपासून सुरुवात झालीय. या शाही स्नानाच्या वेळी अनेकांच्या चर्चेचा विषय ठरले ते अंगावरील ११ किलो सोन्यासह श्रद्धेची डुबकी मारत स्नान करणारे 'गोल्डन बाबा'.
जुना दशनाम आखाड्यातील 'गोल्डन बाबा'नंही कुशावर्तावर शाही स्नान केलं. त्यांच्या अंगावर असणाऱ्या सोन्यामुळे ते लगेचच सगळ्यांच्या नजरेत भरत होते.... त्यांच्याकडे पाहून अनेकांच्या भुवया उंचावत होत्या... आणि त्यांना पाहायलाही एकच गर्दी झाली होती.
विशेष म्हणजो जूना आखाड्यातील राधे माँ आणि गोल्डन बाबा हे एकाच म्हणजे 'जूना दशनाम' आखाड्याशी संबंधीत आहेत.
अधिक वाचा - कुंभमेळ्याविषयी सर्व काही...
कुंभमेळ्यानिमित्त त्र्यंबकेश्वरात विविध साधूंचं आगमन झालंय. असेच, कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये दाखल झालेल्या १०५ वर्षीय महंत गोपाळ आनंद ब्रम्हचारी महाराज यांनी शाही स्नान केलंय. महंत अग्नेय आखाड्याचे प्रमुख असलेले गोपाळ महाराज गेल्या ८४ वर्षांपासून कुंभमेळ्यात सहभागी होतायत. यंदाचा हा त्यांचा सातवा कुंभमेळा आहे. शाही स्नान झाल्यानंतर साधू महंतांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतलंय.
साधू-महंतांचं स्नान झाल्याशिवाय सामान्यांना परवानगी नाकारली
कुंभमेळ्याच्या पहिल्या शाही स्नानासाठी रामकुंडावर गर्दी पाहायला मिळतेय.. आखाड्याचे जत्थेच्या जत्थे रामकुंडावर दाखल झालेत.. साधू महंतांसोबतच राजकीय नेतेमंडळींची उपस्थितीही दिसून येतेय.
या सर्व आखाड्याच्या साधू-महंतांच्या स्नानाशिवाय सामान्य भाविकांना मात्र स्नानासाठी परवानगी दिली जात नाहीय. त्यामुळे सामान्य भाविकांना मात्र ताटकळत आणि साधूमहंतांना स्नान करताना पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र, पुढच्या वेळी हे निर्बंध हटवण्याबाबत काळजी घेऊ असं पालकमंत्री आणि कुंभमेळ्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलंय.
नाशिकमध्ये शाही मिरवणुकीसाठी स्थानिकांमध्येही उत्साह पाहायला मिळतोय. पिढी बदलतेय तसा तरुणांमध्येही उत्साह पाहायला दिसून येतोय. मिरवणुकीच्या स्वागतासाठी जागोजागी रांगोळीचे सडे पाहायला मिळतायत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.