पिंपरी चिंचवडमध्ये इमारतीवरुन उडीमारून विद्यार्थीनीची आत्महत्या

महाविद्यालयाच्या इमारतीवरुन उडीमारून विद्यार्थीनीने आत्महत्या घेतली. चिंचवड येथील संगवी केसरी विद्यालयात ही घटना घडली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 7, 2017, 10:09 PM IST
पिंपरी चिंचवडमध्ये इमारतीवरुन उडीमारून विद्यार्थीनीची आत्महत्या title=

पिंपरी चिंचवड : महाविद्यालयाच्या इमारतीवरुन उडीमारून विद्यार्थीनीने आत्महत्या घेतली. चिंचवड येथील संगवी केसरी विद्यालयात ही घटना घडली.

चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन एका विद्यार्थीने आत्महत्या केली. हा प्रकार आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडला. शितल गोपळ जाधव (18, रा. सांगवी) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थीनीचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले, शितल फार्मसीच्या तिसऱ्या वर्षात शिकते. शितलच्या वडिलांनी दोन दिवसांपूर्वी काही कारणास्तव तिला बेदम मारहाण केली होती. यामुळे दोन दिवसांपासून ती नैराश्यग्रस्त होती. आज दुपारी कॉलेजच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली.