चोरीचा आळ घेतल्याने विद्यार्थिनीनं केली आत्महत्या

येथे वर्गमैत्रीण आणि शिक्षिकेने मोबाईल चोरल्याचा आरोप केल्याने विद्यार्थिनीनं आत्महत्या केली. निकिता अंदस्कर असं या विद्यार्थिनीचं नाव आहे.

Updated: Jan 30, 2016, 05:58 PM IST
चोरीचा आळ घेतल्याने विद्यार्थिनीनं केली आत्महत्या title=

वर्धा : येथे वर्गमैत्रीण आणि शिक्षिकेने मोबाईल चोरल्याचा आरोप केल्याने विद्यार्थिनीनं आत्महत्या केली. निकिता अंदस्कर असं या विद्यार्थिनीचं नाव आहे.

दरम्यान, विद्यार्थिनीचा मृतदेह घेऊन नातेवाईक शाळेत पोहोचलेत. शिक्षिकेवर कारवाईंच्या मागणीला घेऊन नातेवाईकांमध्ये प्रचंड संताप आहे. कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह न उचलण्याचा निर्णय नातेवाईकानी घेतलाय.

तर निकीताच्या वर्ग मैत्रिणीने तिच्यावर मोबाईल चोरल्याचा आरोप केला होता. त्यात ही बाब वर्गशिक्षिकेपर्यंत पोहोचली. मोबाईल चोरला नाही, असे निकिताने वारंवार शिक्षिकेला सांगितले. मात्र शिक्षिकेनं तिचं ऐकलं नाही.

भर वर्गात झालेल्या अपमानामुळे व्यथित झालेल्या निकीताने आपल्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येला शिक्षिका जबाबदार असल्याचा उल्लेख निकीताच्या सुसाईड नोटमध्ये आढळलाय.