'आईसारखंच तुलाही संपवून टाकेन' धमकावत सख्या बहिणीवर बलात्कार

एका नराधमानं आपल्या सख्या बहिणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत घडलीय. 

Updated: Sep 23, 2015, 10:52 AM IST
'आईसारखंच तुलाही संपवून टाकेन' धमकावत सख्या बहिणीवर बलात्कार    title=

डोंबिवली : एका नराधमानं आपल्या सख्या बहिणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत घडलीय. 

उल्लेखनीय म्हणजे, पाच वर्षांपूर्वी याच आरोपीनं आपल्या आईची हत्या केली होती. त्यावेळी तो अल्ववयीन असल्या कारणानं न्यायालयानं त्याची रवानगी भिवंडीतील बालसुधारगृहात केली होती. दोन वर्षानंतर तो बाहेर पडला. या दरम्यान त्याच्या वडिलांनी दुसरा विवाह केला होता.

सुटका झाल्यानंतर सावत्र आई आपल्या सख्या बहिणीला छळत असल्याचं कारण पुढे करत त्यानं आपल्या बहिणीला आपल्यासोबत डोंबिवलीला आणलं. डोंबिवली पूर्व भागात त्यानं भाड्यानं खोली घेतली होती. इथंच त्यानं आपल्या सख्या बहिणीवर अत्याचार केले... 

याबद्दल कुठे वाच्यता केली तर आईला संपवलं तसं तुला संपवून टाकेन असं त्यानं बहिणीला धमकावलं. आपल्या एका मैत्रिणीशी बोलताना पीडित मुलीनं तिच्याजवळ ही घटना कथन केली. मैत्रिणीला पहिल्यांदा धक्काच बसला पण, तिनंही प्रसंगावधान राखत आपल्या आई-वडिलांना या घटनेची माहिती दिली... आणि त्यांनी रामनगर पोलीस स्टेशन गाठलं. 

रामनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून न्यायालयानं त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय, अशी माहिती डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक मनाली काटकर यांनी दिलीय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.