चिमुकल्या 'राजकीय धुरंधरा'नं घेतली अण्णांची भेट

श्रीगोंदा तालुक्यातील लहानग्या घनश्याम दरवडे यानं ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी इथे जाऊन भेट घेतली.

Updated: Jan 17, 2016, 08:55 PM IST

राळेगणसिद्धी : श्रीगोंदा तालुक्यातील लहानग्या घनश्याम दरवडे यानं ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी इथे जाऊन भेट घेतली.

शेतक-यांच्या समस्या तसंच भ्रष्टाचार यासारख्या प्रश्नांवर घनश्याम याने अण्णांसोबत चर्चा केली. इतकंच नाही तर अण्णांनी देशासाठी उभारलेल्या लढ्यांमध्ये सहभागी होणार असल्याचंही घनश्यामनं अण्णांना हमी दिली. तर दुसरीकडे अण्णांनी देखील घनश्यामचे कौतुक केले आहे. घनश्याम सारखी मुलं पुढे जाऊन देशसेवा करणार असतील तर देशाला उज्वल भविष्य मिळेल, असा विश्वास अण्णांनी दाखवला.

एव्हढेच नाही तर घनश्याम कडे पाहून मला वयाच्या ७८ व्या वर्षी दोन पावलं पुढे टाकण्याची शक्ती मिळाली असल्याचे देखील अण्णांनी म्हटलंय.