परभणीत दरोडेखोरांचा गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

परभणीतल्या पाथरीत दरोडेखोरांनी अक्षरक्ष: धुमाकूळ घातलाय. या दरोडेखोरांनी एका गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. 

Updated: Dec 29, 2015, 01:37 PM IST
परभणीत दरोडेखोरांचा गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार title=

परभणी : परभणीतल्या पाथरीत दरोडेखोरांनी अक्षरक्ष: धुमाकूळ घातलाय. या दरोडेखोरांनी एका गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. 

पाथरी शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर ही घटना घडली. सेलूरोडवरील खेडूळा शिवारात ही घटना घडली आहे.  

या घटनेमध्ये तीन जणांना गंभीर जखमी केले असून त्यांच्यावर परभणीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काल रात्री उशिरा घडलेल्या या प्रकारानंतर पोलिसांना याची माहिती मिळाली.

पोलिसांनी त्वरित कारवाई करत नाकेबंदी करून कोम्बिग ऑपरेशन चालू केलं. यामध्ये पोलिसांनी चार संशयिताना ताब्यात घेतलं असून पुढील तपास चालू आहे.