हरिनाम सप्ताहाचा हिशोब मागितला म्हणून महिलेवर गँगरेप!

अहमदनगरमध्ये एका ४५ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना घडलीय. माजी सरपंचासह चार नराधमांनी हा बलात्कार केलाय. 

Updated: Mar 31, 2015, 10:40 AM IST
हरिनाम सप्ताहाचा हिशोब मागितला म्हणून महिलेवर गँगरेप! title=

अहमनदनगर : अहमदनगरमध्ये एका ४५ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना घडलीय. माजी सरपंचासह चार नराधमांनी हा बलात्कार केलाय. 

रामनवमी हरिनाम सप्ताहाचा हिशेब मागितल्याच्या रागातून हे कृत्य केलंय. तारकेश्वर गडामुळे येथे भाविकांची ये-जा असते. चार दिवसांपूर्वी येथे हरिनाम सप्ताह झाला. सप्ताहाच्या संयोजनात सरपंच लक्ष्मण पुंजा घुले याचा पुढाकार होता. 

महिलेचा पती आणि मुलाला यावेळी बेदम मारहाण करण्यात आली. २१ वर्षांच्या मुलाला यावेळी शेजारच्याच खोल्यात बांधून ठेवण्यात आलं होतं. यापूर्वी घुले याच्या मुलीचा विवाह ८ फेब्रुवारी रोजी झाला. त्या वेळी मुलगी अल्पवयीन असल्याचे पोलिसांना कळविण्यात आले होते. तोही राग सरपंच घुलेच्या डोक्यात होताच.

नेवासे तालुक्यातील राजेगाव इथं ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी सोनई पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपी सरपंच लक्ष्मण घुले, भागवत घुले, शिवाजी शिरसाट आणि संदीप शिरसाट फरार आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.