चौथीतल्या विद्यार्थ्याची कौतुकास्पद कामगिरी

शहीद जवानांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे येतात. पण नांदेडमध्ये चौथीत शिकणाऱ्या राघवेंद्र या विद्यार्थ्याने शहीद जवानांच्या कुटुबियांच्या मदतीसाठी अनोखी मदत केली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 12, 2017, 07:59 PM IST
चौथीतल्या विद्यार्थ्याची कौतुकास्पद कामगिरी title=

नांदेड : शहीद जवानांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे येतात. पण नांदेडमध्ये चौथीत शिकणाऱ्या राघवेंद्र या विद्यार्थ्याने शहीद जवानांच्या कुटुबियांच्या मदतीसाठी अनोखी मदत केली आहे. त्याच्या या मदतीने सैनिक कार्यालयातील अधिकारीही भारावून गेलेत. सैनिकांसाठी ही लाखमोलाची मदत केल्यानंतर राघवेंद्रचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सगळीकडे कौतुक होतंय. त्याला कारणंही तसंच आहे.चौथीत शिकणाऱ्या राघवेंद्रने सर्वांना लाखोमोलाचा संदेश दिलाय.. उरी हल्ल्यात नांदेडचा वीर जवान संभाजी शहीद झाला.. राघवेंद्रनं या शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी वडलांकडे तगादाच लावला.. त्यानं सायकल खरेदीसाठी जमाकेलेली अडीच हजारांची रक्कम मदत म्हणून देण्याचं ठरवलं...

वडीलांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय गाठलं. मदत देण्याबाबत विचारणा केली आणि कोणतीही प्रसिद्धी न करता राघवेंद्रनं जमा केलेली रक्कम सैनिक कल्याण कार्यालयात सुपुर्त केली. जिल्हा माहिती कार्यालयाने ही बातमी प्रसिद्धी माध्यमांकडे दिल्यानंतर शाळेला राघवेंद्रच्या कर्तुत्तवाबाबत माहिती झाली.

राघवेंद्रच्या या मदतीनं सैनिक कल्याण कार्यालातील अधिकारीही भारावून गेलेत. एका चिमुकल्याच्या मनात हा विचार येऊ शकतो, यातून प्रेरणा घेऊन ईतरांनी पुढाकार घेतल्यास भारताच्या वीर जवानांच्या कुटुंबियांना कसलीही कमतरता भासणार नाही अशी भावना अधिका-यांनी व्यक्त केली. अवघ्या 10 वर्षाच्या वयात राघवेंद्रने केलेले कौतुकास्पद कार्य सर्व देशवासियांना प्रेरणा देणारे आहे.