चाळीसगाव : साप उडतो, उडणाऱ्या सापाची गोष्टी आपण पुराणात ऐकल्या आहेत. पण त्या सापाला प्रत्यक्षात कोणी पाहिले नाही. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात असलेल्या पाटणादेवी अभयारण्यात ब्राँझ बॅक (रुखई) हा उडणारा साप आढळून आला. वन विभागाने अभयारण्यात लावलेल्या 'ट्रॅप कॅमेऱ्यात त्याचा हा अद्भूत संचार आढळून आला आहे.
वन्यजीवांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी पाटणादेवीच्या जंगलात येथील मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली 'ट्रॅप कॅमेरा' लावून वन्यजीवांच्या नोंदी ठेवल्या जातात. २७ जानेवारीला जंगलातील वन विभागाच्या लिलावती विश्रामगृहाच्या मागील भागात 'ट्रॅप कॅमेरा' लावला होता. दुसऱ्या दिवशी यातील फोटो वन अधिकाऱ्यांनी पाहिल्यावर एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जाणारा साप आढळून आला.
या फोटोमध्ये एक रानडुक्कर खाली चरत असून त्याच्या अंगावर साप उडताना दिसत आहे. या फोटोबद्दल राजेश ठोंबरे यांनी वन विभागाला कळविले. हा साप पूर्णपणे बिनविषारी आणि सुंदर साप आहे. हा साप झाडावर राहतो. एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जाण्यासाठी तो असा उडत जाण्याची क्रिया तो क्वचितच करतो.
कसा उडतो साप पाहा हा व्हिडिओ
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.