५ दिवसांपासून राज्यात पावसाचा हाहाकार

गेल्या 4 ते 5 दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे विविध ठिकाणी  नद्यांना महापूर आलेत. 

Updated: Aug 3, 2016, 08:12 PM IST
५ दिवसांपासून राज्यात पावसाचा हाहाकार title=

मुंबई : गेल्या 4 ते 5 दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे विविध ठिकाणी  नद्यांना महापूर आलेत. 

काल नाशिक जिल्ह्यातल्या सर्व धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाल्यामुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. काल पावसाने राज्यात 8 बळी घेतले. 

तर काल महाबळेश्वर परिसरात झालेल्या प्रचंड पावसाने कोकणात महाडजवळून वाहणा-या सावित्री नदीला महापूर आलाय. 

या नदीवर असलेला मुंबई गोवा हायवेवरचा ब्रिटीशकालीन पूल रात्री वाहून गेला. त्यामुळे मोठा हाहाकार माजलाय. तर नाशिक जिल्ह्यात गोदावरीला आलेल्या पुरामुळे औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यात सरला बेट, वांजर गांव परिसरात मोठा फटका बसलाय. 

नदी दुथडी भरून वाहत असल्याने या गावचा संपर्क तुटला आहे. या गावमध्ये 400 लोक अडकले आहेत.