जालना : बदनापूर तालुक्यातील दाभाडी इथे अज्ञाताने केलेल्या गोळीबारात एक जण जखमी झाला आहे. शमीम मिर्झा असं या जखमी हॉटेलचालकाचं नाव आहे.
रात्री साडेनऊ वाजता बसस्टॅंड परीसरात ही घटना घडली. रात्री अंधाराचा फायदा घेऊन अज्ञाताने त्यांच्या दिशेने फ़ायरिंग केले. शमीम यांच्या ओरडण्याच्या आवाजाने परीसरातील नागरीकांनी त्यांच्याकडे धाव घेतली. रक्तबंबाळ अवस्थेत शमीमला दवाखान्यात उपचारसाठी नेले. पोलिसानी गावकरयांच्या मदतीने परिसरात शोध घेऊन गोळीबार झालेली बंदुकीची गोळी शोधली.
शमीम यांच्या पोटाच्या बाजूला गोळी लागल्यानं त्यांना जालनामधील घाटी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आल असून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. दरम्यान हसनाबाद पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे.