डोंबिवलीत गोळीबार, मुकेश पाटीलसह ५ जणांना अटक

 येथील सोनारपाडामध्ये शिवसेनेच्या नगरसेविकेच्या पतीने सांस्कृतिक कार्यक्रमात गोळीबार केला. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी मुकेश पाटीलसह ५ जणांना अटक केली. 

Updated: Jan 2, 2016, 03:31 PM IST
डोंबिवलीत गोळीबार, मुकेश पाटीलसह ५ जणांना अटक title=

डोंबिवली :  येथील सोनारपाडामध्ये शिवसेनेच्या नगरसेविकेच्या पतीने सांस्कृतिक कार्यक्रमात गोळीबार केला. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी मुकेश पाटीलसह ५ जणांना अटक केली. 

सोनारपाडा येथे काल रात्री सांस्कृतिक कार्यक्रमात गोळीबारीची घटना घडली आहे. शिवसेना नगरसेविका प्रमिला पाटील या नगरसेविकेचा पती मुकेश पाटील याने हा गोळीबार केला. 

भोजपूरी कार्यक्रमादरम्यान वादातून ही गोळीबारीची घटना घडली. मुकेश पाटीलसह ५ जणांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणानंतर येथे तणावाचे वातावरण आहे.