मनमाड नगरपालिका निवडणूक प्रचारात हाणामारी

जिल्ह्यातल्या मनमाड नगरपालिका निवडणूक प्रचाराला गालबोट लागलंय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये पूर्व वैमानस्यातून झालेल्या हाणामारीत, दोन उमेदवारांसह चार जण गंभीर जखमी झाले. 

Updated: Nov 23, 2016, 07:01 PM IST
मनमाड नगरपालिका निवडणूक प्रचारात हाणामारी title=

नाशिक : जिल्ह्यातल्या मनमाड नगरपालिका निवडणूक प्रचाराला गालबोट लागलंय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये पूर्व वैमानस्यातून झालेल्या हाणामारीत, दोन उमेदवारांसह चार जण गंभीर जखमी झाले. 

या घटनेनंतर मनमाड शहरात तणावाचं वातावरण आहे. मनमाडचे माजी नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग एकचे उमेदवार योगेश पाटील आणि प्रभाग दोनचे काँग्रेस समर्थक उमेदवार रफिक शेख हे दोघेही या हाणामारीत जखमी झालेत. 

काल रात्री किरकोळ वादातून रफिक शेख आणि योगेश पाटील यांच्यात वाद झाला. आज सकाळी हे दोन्ही गट एका अंत्यविधीत एकमेकांसमोर आले. अंत्यविधी उरकून बाहेर पडत असताना दोन्ही गटांत तुफान हाणामारीत झाली. 

यात तलवारी, लाठ्याकाठ्या आणि लोखंडी रॉड घेऊन दोन्ही गट एकमेकांना भिडले. पोलिसांनी दोन्ही गटांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून, तीन जणांना अटक केली आहे.