पेंढारकर कॉलेजच्या व्यवस्थापनाविरोधात साखळी उपोषण

व्यवस्थापन मंडळ हे बेकायदेशीर आणि स्वयंघोषित असल्याचा अहवाल मुंबई विद्यापीठानं दिला आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 27, 2017, 10:51 AM IST
पेंढारकर कॉलेजच्या व्यवस्थापनाविरोधात साखळी उपोषण title=

डोंबिवली : डोंबिवलीतील के.व्ही. पेंढारकर महाविद्यालयाचं व्यवस्थापन मंडळ हे बेकायदेशीर आणि स्वयंघोषित असल्याचा अहवाल मुंबई विद्यापीठानं दिला आहे. 

हे व्यवस्थापन बरखास्त करा, महाविद्यालयावर प्रशासक नेमावा अशा प्रमुख मागणीसाठी १३ फेब्रुवारी २०१७ पासून महाविद्याल्यासमोर कर्मचारी साखळी उपोषणाला बसले होते. 

राजश्री शाहू महाराज कर्मचारी संगटनेच्या नेतृत्वाखाली हे साखळी उपोषण सुरु होतं. अखेर  २४ मार्चला  चाळीसाव्या दिवशी राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी दखल घेऊन महाविद्यालयावर प्रशासक नियुक्त करण्याचं ठोस आश्वासन दिलं. यामुळे समाधान व्यक्त करत हे उपोषण मागे घेण्यात आलं.