परभणीत तुरीनं भरलेला शेतकऱ्यांचा ट्रक चोरीला

राज्यातील तुर उत्पादक शेतकरी चोहोबाजूनी संकटांनी घेरला गेला आहे.  अवकाळी पावसामुळे खरेदी केंद्रावरील तूर भिजली असतानाचा आता काही ठिकाणी तुरीची चोरी होत असल्याचे प्रकार घडतायेत. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 30, 2017, 06:26 PM IST
परभणीत तुरीनं भरलेला शेतकऱ्यांचा ट्रक चोरीला title=

परभणी : राज्यातील तुर उत्पादक शेतकरी चोहोबाजूनी संकटांनी घेरला गेला आहे.  अवकाळी पावसामुळे खरेदी केंद्रावरील तूर भिजली असतानाचा आता काही ठिकाणी तुरीची चोरी होत असल्याचे प्रकार घडतायेत. 

परभणीत तुरीनं भरलेला ट्रक चोरीला गेलाय.. वसमत रोडवरील एमआयडीसी परिसरातील तूर विक्री केंद्रावर ही घटना घडलीये.

 या ट्रकमध्ये 9 शेतक-यांची तूर ठेवली होती..ट्रकसह तब्बल चौदा लाखांची तुर चोरीला गेल्यानं शेतक-यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.. यासंदर्भात नवा मोंढा पोलीस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील बाजार समितीच्या प्रांगणातून जवळपास ७५ किलो वजनाचे २३ कट्टे  तूर चोरीला गेलीये. जवळपास ८० हजार रुपयांची ही तूर होती.   
                     
चोरीला गेलेली तूर नांदुरा तालुक्यातील सोनज गावातील शेतकरी सारंगधर दामोधरराव देशमुख यांची होती. त्यांनी २३ फेब्रुवारीपासून जवळपास ४८ कट्टे तूर विक्रीसाठी बाजार समिती नांदुरा येथे आणली होती. त्यापैकी २३ कट्टे तूर चोरी गेलीये. तर २५ कट्टे तिथेच पडून आहे.