नाना पाटेकरांना आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलगी म्हणाली...

मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर कोल्हापूर जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी १५ हजार रूपयांची मदत करत होते.

Updated: Apr 26, 2016, 10:53 PM IST
नाना पाटेकरांना आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलगी म्हणाली... title=

कोल्हापूर : मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर कोल्हापूर जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी १५ हजार रूपयांची मदत करत होते. तेव्हा सिरोळ तालुक्यातील पूजा नावाच्या मुलीने यावर आपलं मनोगत व्यासपीठावर व्यक्त केलं, तेव्हा सर्वांच्या डोळयात पाणी आलं.

संपूर्ण परिवाराला विष पाजलं, पूजा वाचली

पूजाच्या वडिलांनी कर्जाला कंटाळून, संपूर्ण परिवाराला विष पाजून स्वत: देखील आत्महत्या केली आहे, पूजा मामाच्या गावाला गेली होती म्हणून वाचली.

पूजा नाना पाटेकरांना म्हणाली....

नाना पाटेकर यांनी पूजाला १५ हजार रूपयांची मदत केली, त्यावर बोलताना पूजा म्हणाली, नानांनी मला १५ हजार रूपये दिले मी आभारी आहे, पण माझ्या शिक्षणाची जबाबदारी मी शिकत असलेल्या शाळेने घेतली आहे. तेव्हा मी हे १५ हजार रूपये अशा मुलीला देऊ इच्छीते, ज्या मुलीच्या वडिलांनी आत्महत्या केली आहे.