यंदा पाऊस उत्तम, पण अवकाळी पावसाचा धोका - भेंडवळची भविष्यवाणी

३०० वर्षांची परंपरा लाभलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी कथन करण्यात आली असून शेतकऱ्यांसाठी आनंदाची तेवढीच चिंतेची देखील बातमी आहे.

Updated: Apr 22, 2015, 06:41 PM IST
यंदा पाऊस उत्तम, पण अवकाळी पावसाचा धोका - भेंडवळची भविष्यवाणी  title=

जळगाव जामोद: ३०० वर्षांची परंपरा लाभलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी कथन करण्यात आली असून शेतकऱ्यांसाठी आनंदाची तेव्हढीच चिंतेची देखील बातमी आहे. ह्यावर्षी चांगला पाऊस पडणार असून पीकपाणी देखील चांगले राहणार असल्याचं भाकीत करण्यात आलं आहे. परंतु जास्त पावसामुळं पिकाची नासाडी देखील होणार असल्याच सांगण्यात येत आहे. 

यंदाच्या पावसाचा अंदाज बुलढाण्यातल्या जळगाव जामोदमधल्या भेंडवळमध्ये असा वर्तवण्यात आला. यंदा पावसाचं प्रमाण चांगलं असून पहिल्या महिन्यात समाधानकारक पाऊस पडेल, तर दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या महिन्यात चांगला पाऊस पडणार असल्याची भविष्यवाणी करण्यात आली. 

पाहूयात नेमकी कुठली पिकं चांगली होणार आहेत -
कापूस, ज्वारी, तूर, तीळ, पीक चांगलं होईल. मूग, उडीद पिक साधारण असेल तर गहू, हरभरा, वाटाणा पिकाचं सुमार उत्पादन होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. 

भेंडवळच्या भाकितावर विदर्भ, खान्देशातल्या शेतकऱ्यांचा विश्वास असून इथले शेतकरी त्यानुसार नियोजन करतात. भेंडवळच्या भाकितावर शेतकऱ्यांसह काही राजकीय नेत्यांचाही विश्वास दिसून येतो.

तर याला कुठलाही तांत्रिक आधार नसून यावर कुठल्याही शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये असं आवाहन अंनिसनं केलंय. एकूणच हे सर्व अंदाज आहेत... त्यामध्ये किती खरे ठरतात हे येणारा काळच सांगेल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.