अहमदनगर : कोपर्डी प्रकरणी बुधवारी अहमदनगरच्या जिल्हा सत्र न्यायालयात मुख्य साक्षीदार असलेल्या प्रत्यक्षदर्शीची साक्ष नोंदवण्यात आली. पिडीत मुलीचा मावस भाऊ हा प्रत्यक्षदर्शी असून त्याची साक्ष नोंदवण्यात आली.
घटनेच्या वेळी मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे याला आपण पळताना पाहिल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच पिडीत मुलीची सायकल आणि पिडीत मुलीवर अत्याचार झाल्याचं पाहिलं. मात्र आरोपींचा पाठलाग केला असता ते निसटल्याचं त्यांनी सांगितलं. याप्रकरणी एकुण 70 साक्षीदार असून 3 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली.
दरम्यान या प्रकरणातील तिसरा आरोपी नितीन भैलुमे याच्या वकिलाने या न्यायालयावर आमचा विश्वास नसल्याचं सांगत खटला दूसरा न्यायालयात चालवावा असा अर्ज उच्च न्यायालयात केला आहे.