एक्स्प्रेस हायवे |जड वाहनांना शिस्त लावण्यासाठी बॅरिअर्स

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे वर अवजड वाहनांना शिस्त लावण्याचे अनेक उपाय आजपर्यंत करण्यात आले.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 9, 2017, 09:10 AM IST
एक्स्प्रेस हायवे |जड वाहनांना शिस्त लावण्यासाठी बॅरिअर्स title=

पुणे : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे वर अवजड वाहनांना शिस्त लावण्याचे अनेक उपाय आजपर्यंत करण्यात आले...पण त्याचा बेशिस्तीला आळा घालण्यात काही केल्या उपयोग होत नसल्यानं आता प्रशासनानं बॅरिअर्सचा पर्याय निवडलाय. 

मुंबई-पुणे एक्स्प्रपेस हायवेवर अवजड वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी एक नवा तोडगा शोधण्यात आलाय.  हायवे सुरक्षा गस्त पथकानं सुचवलेल्या सुचनेनुसार आता सर्वात डाव्या बाजूच्या लेनमध्ये बसेस आणि अवजड वाहनांसाठी उच्च प्रतिची रबरी बॅरिअर्स लावण्यास सुरूवात करण्यात आलीय.

 सोमवारी खालापूरजवळ काही बॅरिअर्स लावण्यात आली आहेत. तर टप्प्या टप्प्यानं प्रत्येक 300 मीटरवर ही बॅरिअर आता लावण्यात येणार आहेत. यामुळे ओव्हरटेकिंगच्या नादात होणारे अपघात टाळण्यास यामुळे मदत होणार आहे.  शिवाय उजव्या लेनमध्ये छोट्या गाड्यांना वेगात प्रवास करता येणार आहे.