खेडात स्फोटके जप्त, एक अटकेत

जिल्ह्यातील खेड तालुक्यात पोलिसांनी स्फोटक जप्त केली आहेत. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 11, 2017, 10:53 AM IST
खेडात स्फोटके जप्त, एक अटकेत title=

रत्नागिरी : जिल्ह्यातील खेड तालुक्यात पोलिसांनी स्फोटक जप्त केली आहेत. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

खेड तालुक्यातील तळे गावातील चंदनवाडीत स्फोटक असल्याची माहिती खेड पोलिसांना मिळाली होती. याच आधारे खेड पोलिसांनी सापळा रचून तळे गावातील बाईत यांच्या घराची झडती घेतली असता ही स्फोटके सापडली.

या स्फोटकांमध्ये 5 जिलेटीनच्या कांड्या, 2 डिटोनेटर, एक ठासनीची बंदूक पोलिसांना सापडली आहेत. दरम्यान, आरोपी सुभाष बाईत याला खेड पोलिसांनी अटक केली आहे.

ही स्फोटके नेमकी कोठून आणि कशासाठी आणली आहेत याचा तपास खेड पोलीस करत आहेत.