विठूरायाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी दाखल

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. 

Updated: Jul 9, 2014, 12:16 PM IST
विठूरायाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी दाखल title=

पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. कर्नाटकातले बिदरचे राम आणि प्रमिला शेळके दाम्पत्य  मानाचे वारकरी ठरले. पंढरपुरात वैष्णवांचा मेळा जमला. सावळ्या विठूरायाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी दाखल झाले आहेत. टाळ मृदुंगाचा गजर आणि पांडुरंगाच्या जयघोषानं आसमंत दुमदुमला.

विठ्ठल विठ्ठलच्या गजरात अवघी पंढरीनगरी दुमदुमलीय.. लाखो वारकरी सावळ्या विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये दाखल झालेत.. पहाटे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पंढरपूरच्या विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडली.. सपत्निक मुख्यमंत्र्यांनी विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची पूजा केली.. पांडुरंगाच्या मूर्तीला गंध लावून, अभिषेक करुन ही महापूजा संपन्न झाली.. राज्यात चांगला पाऊस पडू दे असं साकडं पांडुरंगाला घातल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी सांगितलं.

यंदा मुख्यमंत्र्यांसह महापूजेचा मान राम आणि प्रमिला शेळके दाम्पत्याला मिळाला.. शेळके दाम्पत्य हे कर्नाटकातल्या बिदरचे रहिवासी आहेत.. मुख्यमंत्र्यांसह राज्य मंत्रिमंडळातले अनेक मंत्री यावेळी उपस्थित होते.. 
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी असं हे सावळ्या विठूरायाचं रुप. डोळ्यात साठवून ठेवावं असं हे विठ्ठलाचं रुप... मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा संपन्न झाली.. तर यानंतर रुक्मिणी मातेची पूजा पार पडली.. या पूजेनंतर तुळशी माळा आणि अलंकारांनी सजलेलं विठ्ठल-रुक्मिणी मातेचं रुप डोळ्यात साठवून ठेवावं असंच होतं.
 
यंदा मानाचे वारकरी ठरलेल्या राम आणि प्रमिला शेळके दाम्पत्याचा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.. शेळके यांची तिसरी पिढी यंदा वारीत सहभागी झालीय. यंदा शेळके दाम्पत्याला महापूजेचा मान मिळाल्यानं त्यांच्या भक्तीचं चीज झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.. राज्य सरकारकडून शेळके दाम्पत्याला आयुष्यभर मोफत एसटीचा पास देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.