अविश्वासामुळे ४० वर्षांची तपश्चर्या वाया : खडसे

भाजपने अविश्वास दाखवल्यामुळे माझी ४० वर्षांची तपश्चर्या धुळीस मिळाली, अशी खंत एकनाथ खडसे यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत बोलून दाखवली. 

Updated: Sep 11, 2016, 05:14 PM IST
अविश्वासामुळे ४० वर्षांची तपश्चर्या वाया : खडसे title=

जळगाव : भाजपने अविश्वास दाखवल्यामुळे माझी ४० वर्षांची तपश्चर्या धुळीस मिळाली, अशी खंत एकनाथ खडसे यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत बोलून दाखवली. 

भोसरी जमीन घोटाळ्याच्या आरोपामुळं अडचणीत आलेल्या माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेंनी पहिल्यांदाच थेट पक्षावर  निशाणा साधला आहे.

प्रसारमाध्यमांच्या बातम्यांवर आंधळा विश्वास ठेवू नका, अशा आशयाचा सल्ला विनोद तावडेंनी उपस्थितांना दिला. 

मात्र, तावडेंच्या त्या वक्तव्यावर कोटी एकनाथ खडसेंनी सणसणतील टोला हाणला. भाजपनं प्रसारमाध्यमांच्या बातम्यांवर विश्वास ठेवला आणि माझी चाळीस वर्षांची तपश्चर्या वाया घालवली, असा टोला खडसेंनी हाणला.

जळगावच्या फैजपूर येथील मनपा शाळेच्या शताब्दी वर्षपूर्ती निमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि एकनाथ खडसे एकाच व्यासपीठावर आले होते.