जळगाव : अखेर एकनाथ खडसे काहीवेळापूर्वी जलगावात दाखल झालेत. सकाळी सहा वाजता दादर अमृतसर एक्सप्रेसनं जळगाव रेल्वे स्थानकावर त्यांचं आगमन होताच समर्थकांनी त्यांना भेटण्यासाठी गर्दी केली होती.
मुक्ताई या त्यांच्या बंगल्यावर ते कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी उपस्थित असतील. त्यानंतर सोयीनुसार ते मुक्ताईनगरसाठी रवाना होतील.
30 कोटींची लाच, भोसरी जमीन खरेदी प्रकरण, अंडर वर्ल्ड डॉन दाऊदशी संभाषण या आरोपांमुळे ४ जूनला खडसेंना सर्व मंत्रिपदांचा राजीनामा द्यावा लागलाय.
यामुळे जिल्ह्यात खडसे सर्मथक आक्रमक झाले होते. गेली अनेक दिवस खडसे मुंबईत तळ ठोकून होते.
दरम्यानच्या काळात जिल्ह्यातील काही कार्यकर्त्यांनी मुंबईला जाऊन त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यकर्त्यांना रोखून संयम पाळण्याच्या सूचना खडसेंनी दिल्या होत्या.