त्यांनी अजय देवगणचा दृश्यम पाहिला आणि...

त्यांनी अजय देवगणचा दृश्यम पाहिला...केलेली हत्या पचवू शकतो असं त्यांना वाटलं.. आणि त्यांनी हत्या केली..ही घटना घडलीय पिंपरी चिंचवड मध्ये... हत्येच्या काही महिन्यानंतर हा प्रकार उघड झालाय...!

Updated: Jan 7, 2017, 01:14 PM IST
त्यांनी अजय देवगणचा दृश्यम पाहिला आणि... title=

पिंपरी : त्यांनी अजय देवगणचा दृश्यम पाहिला...केलेली हत्या पचवू शकतो असं त्यांना वाटलं.. आणि त्यांनी हत्या केली..ही घटना घडलीय पिंपरी चिंचवड मध्ये... हत्येच्या काही महिन्यानंतर हा प्रकार उघड झालाय...!

काही महिन्यांपूर्वी श्रीराम शिवाजी वळेकर हा तरुण बेपत्ता झाला.पोलिसांना त्याच्याबाबत काहीच माहिती मिळत नव्हती. काही दिवसांपूर्वी मेहबूब समिदुल्ला मणियार आणि त्याचे वडील समिदुल्ला अकबरअली मणियार या दोघांवर पोलिसांना संशय आला. तपासात श्रीरामची हत्या या दोघांनीच केल्याचं पुढे आलं. 

श्रीरामनं मेहबूबला 5 लाख व्याजानं दिले होते. पण त्या बदल्यात श्रीरामनं मेहबूबकडून 8 लाख रुपये परत घेतले. त्या भांडणातून श्रीरामचा काटा काढायचा निर्णय त्यांनी घेतला. पण आपण ही हत्या दृष्यम सिनेमा पाहून केली असं आरोपींनी सांगताच पोलीसही चकीत झाले. भाड्यानं एक खोली घेऊन तिथेच श्रीरामची हत्या केली, आणि मृतदेहाची विल्हेवाटही लावली.   

चार महिन्यांनंतर पोलिसांना या हत्येचा उलगडा झाला. चित्रपट पाहून जर असे गुन्हे घडायला लागले तर निश्चितच ही विचार करायला लावणारी बाब आहे.