ठाणे : डोंबिवलीत बुधवारी रात्री औषध कंपनीला भीषण आग लागली. कल्याण शिळ फाटा ररसत्यावरील ओरेक्स फार्मा एका औषध कंपनीला भीषण आग लागली होती.
ही आग विझलण्यास फायर ब्रिगेडच्या जवांनाना ही आग विझवण्यास सकाळ उजडली. सकाळी ६.३० वाजता ही आत विझवण्यात आली. ही आग इतकी भयंकर होती की, या कंपनीतील १० ते १२ सिलेंडरचा स्फोट झाला आणि आगीने रुद्र रुप धारण केलं. कंपनीच्या भोवती दाट वस्ती नसल्याने आणि कंपनीतील कर्मचारी वेळीच बाहेर पडल्याने सुदैवाने या आगीत कोणतीही जीवीत हानी झाली नाही.
कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या ५ गाड्या, उल्हासनगर, अंबरनाथच्या एक एक गाड्या आणि अंबरनाथ एमआयडीसीच्या २ गाड्यांनी ही आग विझवलीये. या आगीत कंपनीचे जवळपास १०० टक्के नुकसान झालं आहे. मात्र आग लागली कशी याचं कारण अजून स्पष्ट झाले नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.