मालेगाव: समाजातील काही अनिष्ठ प्रथांना अजूनही लगाम लावता आलेला नाहीय. हुंडा पद्धतीमुळं पुन्हा एकदा एका महिलेला आपला जीव गमवावा लागलाय. २० वर्षीय गर्भवती महिलेवर रॉकेल टाकून जाळण्याचा धक्कादायक प्रकार मालेगावच्या आयेशा भागात घडलाय.
फरजाना फत्तेखान हिला पती, सासू आणि नणंद माहेरून हुंडा आणण्यासाठी तगादा लावत मानसिक आणि शाररिक छळ करत होते. १० जून रोजी पती, सासू आणि नणंदनं पुन्हा हुंड्याची मागणी, मारझोड करत तिच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिलं, या घटनेत फरजाना गंभीर भाजली.
मालेगावच्या सामान्य रुग्णालयात उपचार सुरु असतानाच तिचा मृत्यू झाला. ही घटना घडली तेव्हा फरजाना ४ महिन्याची गर्भवती होती. आयेशा नगर पोलिसांत पती, सासू आणि नणंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पती फत्तेखान अय्युब खान आणि सासू सलाम अय्युबखानला अटक केली असून नणंद फरजाना अबकार शेख अजूनही फरार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.