हुंडाबळी : महिलेनं तीन वर्षांच्या मुलीसह जाळून घेतलं

लातूर शहरातल्या माताजी नगर परिसरात आज हुंडाबळीनं जान्हवी काळे या महिलेचा बळी घेतला. 

Updated: Apr 3, 2015, 10:40 AM IST
हुंडाबळी :  महिलेनं तीन वर्षांच्या मुलीसह जाळून घेतलं title=

लातूर : लातूर शहरातल्या माताजी नगर परिसरात आज हुंडाबळीनं जान्हवी काळे या महिलेचा बळी घेतला. 

'माहेरहून पाच तोळे सोनं घेऊन ये' या सततच्या तगाद्याला कंटाळून जान्हवीनं आपल्या तीन वर्षांची मुलगी सुमित्रासह जाळून घेऊन आत्महत्या केलीय.

या घटनेत जान्हवी आणि आणि तिची तीन वर्षांची मुलगी १०० टक्के भाजल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

याप्रकरणी मृत जान्हवीची आई भारतबाई डांगेंच्या फिर्यादीवरून लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळींविरोधात हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

पोलिसांनी या प्रकरणी पती नितीन काळे, सासू नंदा चंद्रशेखर काळे, दीर सचिन चंद्रशेखर काळे आणि बिपीन काळे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.