मुंबई : बंदी घालण्यात आलेल्या जुन्या हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा दानपेटीमध्ये स्वीकारु नका असे आदेश, विधी आणि न्याय विभागानं राज्यातल्या प्रमुख मंदिरांना दिले आहेत.
मंदिर समितीनं भाविकांनाही याबबत आवाहन करण्याच्या सूचनाही विधी आणि न्याय विभागानं दिल्या आहेत. तसंच दान केलेल्या हजार पाचशेच्या नोटा दररोज बँकामध्ये जमा करता येणार नसल्याचे आदेशही विधी आणि न्याय विभागानं राज्यातल्या प्रमुख मंदिरांना दिलेत.
दरम्यान नोटबंदीचा परीणाम मुंबईतल्या सिद्धीविनायक मंदिरच्या दानपेटीवरही दिसून आलाय. दानपेटीत आठवड्याला सरासरी ४० ते ४५ लाखांपर्यंत जमा होणारी रक्कम आता सुमारे ५० टक्क्यांनी घटली आहे.