'दिव्या'त अंधार, केमिकलयुक्त धुरानं नागरिकांना त्रास

ठाण्यातील दिवा परिसरात धुराचं साम्राज्य पसरलंय. तिथल्या डंपिंग ग्राऊंडचा धूर संपूर्ण परिसरात पसरलाय. त्यामुळे नागरिक भयभीत झालेत. 

Updated: Dec 9, 2015, 11:16 AM IST
'दिव्या'त अंधार, केमिकलयुक्त धुरानं नागरिकांना त्रास title=

दिवा : ठाण्यातील दिवा परिसरात धुराचं साम्राज्य पसरलंय. तिथल्या डंपिंग ग्राऊंडचा धूर संपूर्ण परिसरात पसरलाय. त्यामुळे नागरिक भयभीत झालेत. 

दरम्यान, या दिवा डम्पिंग ग्राऊंडमधून उठलेल्या धुरामुळे महानगरपालिकेच्या एका अधिकाराऱ्याला त्रास झाल्याचं समजतंय. त्यांना तातडीनं ज्युपिटर हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलंय. या प्रकरणी मनपा मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करणार आहे. 

या धुरामुळे अनेकांना श्वसनाला त्रास होतोय. धुरामुळे कल्याण - शीळ रस्त्यावर रिक्षा आणि डंपरचा अपघातही झालाय. त्यात तिघेजण जखमी झाले. या डंपीग ग्राऊंडमध्ये केमीकल मिक्स झाल्यानं धुराचे लोट पसरु लागल्याचं सांगण्यात येतंय.

घटनास्थळी ठाण्याचे महापौर संजय मोरे, उपायुक्त संदीप माळवे यांनी भेट दिली. आपत्कालीनं व्यवस्थापनाची टीमही घटनास्थळी आली. हे डंपींग ग्राऊंड हटवावं, अशी मागणी स्थानिक नागरिक करतायत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.