झी इम्पॅक्ट : अखेर तो 'माकड तस्कर' सापडलाच!

महाराष्ट्रातल्या एका घाटात रस्त्यावर गाडी थांबवून एका माकडाला डिक्कीत कोंबणारा तो 'माकड चोर' अखेर पोलिसांना शरण आलाय. 

Updated: Jul 1, 2015, 06:22 PM IST
झी इम्पॅक्ट : अखेर तो 'माकड तस्कर' सापडलाच! title=

पुणे : महाराष्ट्रातल्या एका घाटात रस्त्यावर गाडी थांबवून एका माकडाला डिक्कीत कोंबणारा तो 'माकड चोर' अखेर पोलिसांना शरण आलाय. 

काही दिवसांपूर्वी माकड तस्करीचा एक व्हिडिओ सोशल वेबसाईटवर वायरल होताना दिसत होता. हा व्हिडिओ कुठे शूट करण्यात आला याचा मात्र तेव्हा थांगपत्ता लागलेला नव्हता... मात्र हा प्रकार वरंधा घाटात घडल्याचं आता उघड झालंय. या व्हिडिओत ह्युंडाई आय ट्वेन्टी या गाडीच्या नंबर प्लेटवर मराठीत नंबर लिहिलेला आहे... हा नंबर १७७७ असा दिसत होता. या व्यक्तीचा थांगपत्ता लागल्यास लगेचच तक्रार दाखल करण्याचं आवाहन 'झी मीडिया'नं केलं होतं. 

त्यानंतर माकड तस्करी करणाऱ्या 'त्या' व्यक्तीनं स्वत:च पोलीस स्टेशन गाठलंय. दिलीप घिसरे असं या माकड चोराचं नाव आहे. दिलीप पुरंदर तालुक्यातल्या भिवरी इथं एक ढाबा चालवतो. मंगळवारी, दिलीप स्वत:च भोर इथल्या वनविभागाच्या कार्यालयात हजर झाला... आणि त्यानं आपल्या कृत्याची कबुली दिलीय.

दिलीपनं पळवून नेलेलं माकडही सध्या वनविभागाच्या ताब्यात आहे. दिलीपला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.  

हाच तो व्हिडिओ...

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.