'आश्रमशाळांचा' छळवाद केला उघड, मुलींनाच केलं गायब

धुळे जिल्ह्यात आदिवासी आश्रम शाळा या छळ छावण्या झाल्या आहेत. जिल्ह्यातील नगाव आश्रम शाळेत दोन आदिवासी अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतरही अद्याप प्रशासनानं कुणाच्याही विरोधात कठोर कारवाई केलेली नाही.

Updated: Feb 24, 2015, 10:22 PM IST
'आश्रमशाळांचा' छळवाद केला उघड, मुलींनाच केलं गायब title=

धुळे : धुळे जिल्ह्यात आदिवासी आश्रम शाळा या छळ छावण्या झाल्या आहेत. जिल्ह्यातील नगाव आश्रम शाळेत दोन आदिवासी अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतरही अद्याप प्रशासनानं कुणाच्याही विरोधात कठोर कारवाई केलेली नाही.

 विशेष म्हणजे पीडित मुली आणि त्यांच्या कुटुंबीयांना गावातून गायब करण्यात आलंय. तर त्यातली एक  मुलगी तब्बल तीन महिन्यांची गरोदर असल्याचं समोर आलंय. 

आश्रम शाळेतील ज्या व्यवस्थापकावर हा सर्व प्रकार दडपण्याचा आणि एका मुलीचं शोषण केल्याचा आरोप आहे तो व्यवस्थापक मात्र या सर्व आरोपांचं खंडन करतोय. 

माध्यम आणि सामाजिक राजकीय संघटनाचा दबाव वाढल्यानंतर प्रशासनानं तब्बल १५ दिवस उशिरा कारवाईचे आदेश दिले आहे तर लोकसंग्राम संघटनेनं याविरोधात आंदोलन केलं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.