लातूर : दिवंगत काँग्रेस नेते विलासराव देशमुख यांचे तृतीय चिरंजीव धीरज देशमुख हे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सज्ज झालेत.
लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपद हे सर्वसाधारण जागेसाठी रिक्त झाल्यानंतर धीरज देशमुख यांनी तयारी सुरु केलीय. लातूर तालुक्यातील एकूर्का गटातून ते निवडणूक लढविणार आहेत.
लातूर शहराचे काँग्रेस आमदार तथा माजी राज्यमंत्री अमित देशमुख आणि अभिनेता रितेश देशमुख यांचे ते धाकटे बंधू आहेत. लातूर लोकसभा युवक काँग्रेसचे धीरज देशमुख हे जिल्हाध्यक्ष आहेत.