गुंड नगरसेवक आशिष दामलेला साथीदारासहीत अटक

गुंडगिरी प्रकरणी बदलापूरचा नगरसेवक आशिष दामले याला मध्यप्रदेशच्या ओसरा गावातून अटक करण्यात आलीय. ठाणे ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केलीय. 

Updated: Jun 9, 2015, 06:21 PM IST
गुंड नगरसेवक आशिष दामलेला साथीदारासहीत अटक  title=

बदलापूर : गुंडगिरी प्रकरणी बदलापूरचा नगरसेवक आशिष दामले याला मध्यप्रदेशच्या ओसरा गावातून अटक करण्यात आलीय. ठाणे ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केलीय. 

बदलापूरच्या आश्रमात केली होती तोडफोड प्रकरणी पोलिसांनी मुख्य सूत्रधार दामलेसोबत त्याचा साथीदार केवल वर्मालाही अटक केलीय. या प्रकरणात आत्तापर्यंत दामलेसह १२ जणांना अटक करण्यात आलीय. 

आशिष दामले बदलापूरपासून जवळ असलेल्या इनगावमध्ये नरेश रत्नाकर यांच्या घरात 2 जून रोजी रात्री 11.30 च्या सुमारास 20-25 जणांच्या टोळक्यासह घुसला होता. यावेळी, दामले यांनी आपल्याकडील बंदूक हिसकावून घेऊन एक लाख रुपये लंपास केल्याचा आरोप रत्नाकर यांनी केला होता. 

विशेष म्हणजे, हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता. त्यावेळी दामले यांच्या सुरक्षेत असलेले दोन पोलीसही त्यांच्यासोबत होते. सीसीटीव्ही फूटेजमध्ये दामलेबरोबर एक तरुणीही दिसतेय. ही तरुणी कोण आणि आता कुठे आहे? याबाबतीत अजूनही रहस्य कायम आहे. दामलेविरुद्ध पोलिसांनी धमकावणं, घराची तोडफोड करणं, बंदुकीचा धाक दाखवून लुटमार असं गुन्हे पोलिसांनी दाखल केलेत.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.