शिक्षक-पोलिसांसमोरच लातूरमध्ये 'कॉपी' पॅटर्न

संपूर्ण राज्याला शिक्षणाचा आदर्श लातूर पॅटर्न देणाऱ्या लातूर जिल्ह्यात पुन्हा एकदा दहावी-बारावीच्या परीक्षेत जोरदार कॉप्या सुरु झाल्या आहेत.

Updated: Mar 7, 2017, 05:53 PM IST
शिक्षक-पोलिसांसमोरच लातूरमध्ये 'कॉपी' पॅटर्न title=

लातूर : संपूर्ण राज्याला शिक्षणाचा आदर्श लातूर पॅटर्न देणाऱ्या लातूर जिल्ह्यात पुन्हा एकदा दहावी-बारावीच्या परीक्षेत जोरदार कॉप्या सुरु झाल्या आहेत. लातूर जिल्ह्यातील जळकोट, देवणी, उदगीर, निलंगा, शिरूर अनंतपाळ येथील अनेक केंद्रावर दहावीच्या पहिल्याच पेपरच्या दिवशी जोरदार कॉप्या सुरु होत्या.

शाळेच्या कंपाउंड वॉलवर चढून, उड्या मारून 'मराठी' विषयाच्या पेपरला या कॉप्या पुरविल्या जात होत्या. इतकं खुलेआम कॉप्या सुरु असताना केंद्र प्रमुख, सह केंद्रप्रमुख, शिक्षक तसेच बंदोबस्ताला असलेले पोलीसही या सर्व प्रकाराला मूक संमती देत होते. अशा कॉपी केंद्रावर बोर्ड काय कारवाई करणार हा मोठा प्रश्न आता निर्माण झाला आहे.