पुणे : नोटबंदीनंतर नागरी सहकारी बँकांवर घालण्यात आलेले निर्बंध उठवा, नाहीतर राष्ट्रीयीकृत बँका फोडू, असा इशारा नागरी सहकारी बँकांनी दिलाय.
नागरी सहकारी बँकांनी पुण्यात मोर्चा काढला. सहकारी बँकांच्या मागण्यांवर सात दिवसांत निर्णय घ्या नाही, तर बँका बेमुदत बंद ठेऊ, तसंच राष्ट्रीयीकृत बँका फोडू असा इशारा मोर्चा देण्यात आला.