मुख्यमत्र्यांची पनवेलकरांना भाजपला विजयी करण्याची साद

पनवेल महापालिका निवडणुकीसाठी भाजपने जोरदार कंबर कसलीये. आज मुख्यमंत्र्यांचे भाषण पनवेलमध्ये झाले. 

Updated: May 21, 2017, 10:53 PM IST
मुख्यमत्र्यांची पनवेलकरांना भाजपला विजयी करण्याची साद title=

पनवेल : पनवेल महापालिका निवडणुकीसाठी भाजपने जोरदार कंबर कसलीये. आज मुख्यमंत्र्यांचे भाषण पनवेलमध्ये झाले. 

पनवेल महापालिकेला ६ महिन्यांच्या कालावधीत २८० कोटी रुपये दिले. ग्रामपंचायत राहिली असती तर हे पैसे पनवेलला मिळाले असते का असा थेट सवाल करत, मुख्यमंत्र्यांनी पनवेलकरांकडे पालिका निवडणुकीत भाजपला विजयी करण्याची साद घातली. 

पनवेलला स्मार्ट शहर बनवण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. लवकरच पनवेल विमानतळाचं काम सुरु होऊन ४ वर्षांत ते पुर्ण होणार असल्याचंही फडणवीस म्हणले. दरम्यान हिंदी भाषिक मतदारांसाठी मुख्यमंत्र्यांनी मध्येच हिंदीतूनही भाषण केलं.