मुख्यमंत्र्यांच्या काकूंची व्हॉटसअॅप ग्रुपविरोधात तक्रार

शोभा फडणवीस यांनी व्हॉट्सअॅप ग्रुपविरोधात पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. यानंतर पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार ऑनलाईन मूल या व्हॉट्सअॅप ग्रुपविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपच्या आमदार आणि मुख्यमंत्र्यांच्या काकू शोभा फडणवीस, व्हॉट्सअॅपवरच्या आक्षेपार्ह राजकीय पोस्टमुळे चांगल्याच संतापल्या. 

Updated: Oct 26, 2015, 01:01 AM IST
मुख्यमंत्र्यांच्या काकूंची व्हॉटसअॅप ग्रुपविरोधात तक्रार title=

चंद्रपूर : शोभा फडणवीस यांनी व्हॉट्सअॅप ग्रुपविरोधात पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. यानंतर पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार ऑनलाईन मूल या व्हॉट्सअॅप ग्रुपविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपच्या आमदार आणि मुख्यमंत्र्यांच्या काकू शोभा फडणवीस, व्हॉट्सअॅपवरच्या आक्षेपार्ह राजकीय पोस्टमुळे चांगल्याच संतापल्या. 

यावर, शोभा फडणवीस यांनी यावर बोलण्यास नकार दिला. महत्वाचं म्हणजे व्हॉट्सअॅप ग्रुपचे अनेक सदस्य हे मुख्यमंत्री आणि शोभा फडणवीस यांच्या मूळ गावचे अर्थात मूळ चंद्रपुरातलेच आहेत.

युती शासनाच्या काळात एका कथित घोटाळ्याचा संबंध शोभा फडणवीस यांच्याशी जोडण्यात आला आहे, यावर ही पोस्ट असल्याचं सांगण्यात येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातल्या अनेक भागात ही पोस्ट व्हॉट्सअॅप ग्रुपवर फिरत होती. काही कार्यकर्त्यांनी हा प्रकार शोभा फडणवीस यांच्या लक्षात आणून दिला. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. 
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.