पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडमधल्या एका शाळेच्या उद्घाटनला वेस्ट इंडिजचा स्फोटक बॅट्समन ख्रिस गेलनं हजेरी लावली. यावेळी गेलनं या शाळेतल्या मुलांशी मनमुराद गप्पा मारल्या. मुलांच्या प्रश्नांना गेलनं आपल्या बॅटिंगप्रमाणेच दिलखुलास उत्तरं दिली. यावेळी ख्रिस गेलला पुणेरी पगडी देऊन सन्मानित करण्यात आलं.
गेलनं आपल्या शाब्दिक फटकेबाजीनं उपस्थितांची वाहवा मिळवली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि लारा आपले आवडते क्रिकेटर असल्याचे वेस्ट इंडिजचा तडाखेबाज बॅट्समन ख्रिस गेलनं म्हटलं.