शेफ विष्णू मनोहर यांचा सलग 52 तास कुकिंगचा रेकॉर्ड

सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी पाककलेमध्ये जागतिक पटलावर नवा इतिहास रचला. त्यांच्या या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये नोंद झाली. 

Updated: Apr 23, 2017, 06:02 PM IST
शेफ विष्णू मनोहर यांचा सलग 52 तास कुकिंगचा रेकॉर्ड title=

नागपूर : सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी पाककलेमध्ये जागतिक पटलावर नवा इतिहास रचला. त्यांच्या या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये नोंद झाली. 

ज्या क्षणी त्यांनी या विक्रमाला गवसणी घातली. त्यावेळी उपस्थितांनी ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष केला. अमेरिकेच्या बेंजामिन पेरी यांचा सलग ४० तासांचा कुकिंगचा विश्वविक्रम या नागपुरकर कुकिंग मास्टरनं मोडला. सलग ५२ तास मॅरेथॉ़न कुकिंग करत त्यांनी नवीन विश्वविक्रम प्रस्थापित केला. 

विष्णू मनोहर यांनी एक हजार पाककृती तयार केल्या. यात 90 टक्के देशी तर 10 टक्के परदेशी पाककृतींचा समावेश आहे. चण्याच्या हलवा हा त्यांनी शेवटचा पदार्थ बनवला. 

नागपूरमधल्या इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरच्या सभागृहात विष्णू मनोहर यांनी शुक्रवारी कुकिंग मॅरेथॉनच्या विक्रमाला सुरुवात केली. आठ चुलींवर त्यांची ही कुकिंग मॅरेथॉन सुरु होती. एकाच वेळी तीन ते चार पदार्थ ते तयार करत होते.